स्मार्ट सिटीचा टेंभा मिरवणाऱ्या नाशिक शहरातले रस्ते खड्डेमय झालेत. शहरातील सिडको, म्हसरूळ, गंगापूर रोड, आडगावसह सर्वच परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं या खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झालेत. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातही वाढलेत. खड्ड्यात साठणारं पावसाचं पाणी आणि खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं अनेक दुचाकीचालकांचा अपघात होतोय.
#potholes #roadcondition #nashik #smartcity #potholesonroad #maharashtra #rainyseason #people #nashikcitizen #accidents #cars #twowheeler #vehicles #marathi #news #mararthinews #sakal #sakalnews #updates